Home | Pritam J Mhatre
  • +91 9326050505
  • Shop No 15, Ashoka Garden,Dhutpapeshwar Corner.
  • Banner Image Here

  • Banner Image Here

Image Here

शेतकरी कामगार पक्ष

शेतकरी कामगार पक्ष हा एक महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. आमदार भाई जयंत पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेवर सलग ३ वेळा पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख(सांगोला), भाई विवेक पाटील (पनवेल-उरण), श्रीमती मीनाक्षीताई पाटील(अलिबाग), भाई धैर्यशील पाटील (पेण) हे विधानसभेवर पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. भाई गणपतराव देशमुख हे तब्बल ५० वर्षे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत, ते १९६२ पासून विधानसभेवर निवडून येत आहेत. २०१७ साली, महाराष्ट्रामध्ये पक्षाचे ४ विधानसभा सदस्य, १ विधान परिषद सदस्य आहेत. तसेच रायगड जिल्हा परिषद तसेच पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता आहे. रायगडसह इतर ५ जिल्हा परिषदांमध्ये(नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर ) पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत.अलिबाग, काटोल,बिलोली, इत्यादी नगरपरिषद शेकापच्या वर्चस्वाखाली आहेत तसेच खोपोली, पनवेल मध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत.

Image Here

आमचे ध्येय्य

पनवेल महानगरपालिका क्षेत्र स्वछ व सुंदर करणे हेच आमचे मिशन असून त्यासाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत. घनकचरा व्यवस्थापन करून ,कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून खतनिर्मिती सुरु करणे,रेन वॉटर हार्वेस्टिंग चा प्रकल्प प्रत्येक सोसायटीसाठी बसवून घेऊन वापराचे पाणी म्हणून त्या साठवलेल्या पाण्याचा उपयोग होईल या हि प्रकल्पासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. विजेच्या बचतीसाठी सोलर पॉवर चा वापर होईल या दृष्टीकोनातून सर्व स्ट्रीट लाईट तसेच सर्व सोसायटीमध्ये सोलर लॅम्प तसेच सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे बसवून विजेच्या बचतीसाठी प्रयत्न करणार आहोत.शहराचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी व शहर सुशोभित दिसण्यासाठी आम्ही कित्तेक झाडे लावली आहेत व हे काम असेच चालू ठेवणार आहोत. शहरात पार्किंग व्यवस्था,रस्ते ,मलनिःसारण वाहिन्या यांचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा माझा मानस आहे.सदर संकल्पनांबद्दल आम्ही वेळोवेळी व सातत्याने पालिका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

Image Here

आमचे दृष्टीकोन

समाजकारण हेच ध्येय ठेऊन मी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत आहे. पक्षभेदाला दूर ठेऊन पालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला चांगले जीवन आणि मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छ ,सुंदर,हरित आणि स्मार्ट पनवेल हे माझे ध्येय आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीत पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील ,मा. आमदार विवेक पाटील ,मा. नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे ,आमदार बाळाराम पाटील यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन माझी महानगरपालिकेतील वाटचाल सुरु आहे . पालिका क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक इथे राहतात. बहुसंख्य सिडको क्षेत्रात राहतात. त्यांना सिडकोने मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत. सार्वजनिक आरोग्य, परिवहन सुविधेचा बोजवारा उडाला आहे. ग्रामीण भागाकडे सिडकोचे आणि पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. मी याबाबत ठोस कार्य करणार आहे. याची सुरुवात मी पनवेल शहरातून केली आहे.नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालये, मलनिःसारण वाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यावर भर देणार आहे. माझ्या पाठपुराव्यांमुळे पालिकेच्या तलावांचे शुशोभीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.वडाळे तलावाचे ठाणे तलावपाळीच्या धर्तीवर विकास करून हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यावर माझे लक्ष आहे. पालिकेच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरु करून पालिकेच्या शाळा १० वी पर्यंत करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. पालिकेचे छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करून त्याठिकाणी खेळाडूंना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देणार आहे. खेळाडूंना उत्तम क्रीडांगण, प्रशिक्षण केंद्र, उभारून पनवेलचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उदयास आणण्याचा मानस माझा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना स्पर्धेकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात मी तरतूद करून घेतली आहे.अश्वारुष छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच टपाल नाका येथील अर्धकृती पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे हे माझे ध्येय आहे. तसा प्रस्ताव ही मी सभागृहात मंजूर करून घेतला आहे.

Image Here

आमच्या योजना

वडाळे तलाव शुशोभीकरण करून त्याभोवती जॉगिंग ट्रॅक बांधणे तेथे खाऊगल्ली उभारणे,पाण्यात रंगीत कारंजे तसेच तेथे खाऊगल्ली उभारणे,,नित्यानंद मार्ग काँक्रिटीकरण,पनवेल मधील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून छत्रपती संभाजी मैदान विकसित करणे, पनवेलची शोभा वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे व परिसराचे सुशोभीकरण,पालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारवुन त्या १० वी पर्यंत सुरु करणे,ठाणा नका येथे पादाचारी पूल बांधणे. या सर्व गोष्टीचे नियोजन करून त्याबद्दलचे प्रस्ताव वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे सादर केले आहेत. या पैकी काही प्रस्थावांना मंजुरी मिळून काम देखील सुरु झाले आहे आणि काही प्रस्तावांचे मंजुरीकण प्रलंबित आहेत.

Media Conference

News & Press Release

पनवेल शहरात रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलणार, पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्स्थेस भाडेतत्वावर देण्यास महासभेत मंजुरी

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्थेस भाडेतत्वावर देण्यास महासभेत मंजुरी देण्यात आलेली आहे. याबाबत पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी याबाबत सातत्याने पाठपुरावा ठेवणारे आमदार बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांचे तसेच प्रशासन तसेच सभागृहाचे देखील आभार मानले आहेत.

पनवेल महानगरपालिकेची स्थापना दिनांक १ ओक्टोबर २०१६ रोजी झाली. त्यामध्ये पूर्वाश्रमीचे नगरपरिषदचे क्षेत्र समाविष्ट केले आहे. पुर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषद हद्दीतील अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) हा मंजूर विकास योजनेत व मंजूर नगररचना योजनेत प्रायमरी स्कूल व प्ले ग्राऊंड साठी आरक्षित आहे. सदर भूखंडाचे क्षेत्र ७१८८ चौ.मी. नगररचना योजनेनुसार आहे. पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषदेची नगररचना योजना ही शासनाने दिनांक ३१ ऑगस्ट २००९ अन्वये मंजूर केली आहे. त्याचे अभिलेख (योजनेचे नकाशे व फॉर्म १) हे सन २०१६ रोजी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार अभिलेख म्हणजेच भूखंडाचे मालमत्ता पत्रक व नकाशे करणेस उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल यांना त्याच वेळी देण्यात आले आहेत. अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) या भूखंडाची मोजणी संबंधित विभागाकडून दिनांक १६ मार्च २०२१ रोजी झाली आहे. त्यानुसार त्याचे मालमत्ता पत्रक व भूखंडाचा नकाशा संबंधित विभागाकडून प्राप्त होणार आहे. तसेच सदर भूखंड हा महानगरपालिकेस महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ८८ अन्वये ताब्यात आलेला आहे. सदर भूखंडात महानगरपालिके मार्फत भूखंडाच्या काही भागात जलकुंभ उभारण्यात आलेला आहे. त्याचे क्षेत्र १२०० चौ.मी. आहे. भूखंड नकाशात दर्शविल्यानुसार स्वतंत्र ठेवण्यात यावा.

महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्था संस्थेस भाडेतत्वावर देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा ठेवणारे आमदार बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यानी विशेष प्रयत्न केले. अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) चे क्षेत्र ७१८८ चौ.मी. आहे त्यातील त्यावेळी मूळ भूखंडाचे ९०० चौ.मी. क्षेत्र ताब्यात होते. ते क्षेत्र रयत शिक्षण संस्थेस देणेबाबत पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ७३२ हा तत्कालीन नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०८ नोव्हेंबर २००४ अन्वये देण्यास मान्यता दिली आहे. व उर्वरित क्षेत्रही ताब्यात आल्यावर देण्यास मान्यता दिली आहे. तरी सदर भूखंडाचे ताब्यात असलेले ९०० चौ.मी. क्षेत्र हे नाममात्र भाडयाने देण्यास हरकत नाही.असे पालिकेने म्हटले आहे.

तत्कालीन नगरपरिषदेचे अध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली २००४ साली झालेल्या नगरपरिषदेच्या सभेत अं.भु.क्र.२७३ मधील ताब्यात असणारे ९०० चौ.मी जागा भाडेपट्यावर देऊन उर्वरित जागा ताब्यात आल्यावर देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. आजच्या सर्वसाधारण सभेत उर्वरित जागा देण्यासंदर्भातला विषय मंजूर करण्यात आला. सातत्याने पाठपुरावा ठेवणाऱ्या आमदार बाळाराम पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब यांचे आभार तसेच त्याबद्दल पालिका आयुक्त, प्रशासन तसेच सभागृहाचे देखील आभार.
- प्रितम जनार्दन म्हात्रे
विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका

Read More
रोटरी क्लब ऑफ उलवे नोड आयोजित "उलवे मॅरेथॉन २०२१" ला भेट

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या वतीने आज एक धाव पर्यावरण संवर्धनासाठी या ब्रीदवाक्य अंतर्गत "उलवे मॅरेथॉन 2021" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट दिली व विजेतेपद पटकवणाऱ्या खेळाडूंना बक्षिस देऊन गौरविले. यावेळी माझ्यासह रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रविशेठ पाटील, मा.डॉ.गिरीश गुणे, एल अँड टी प्रोजेक्ट हेड मा.श्री. सुनील कोल्हे, डॉ.अनिल परमार, सिनेअभिनेते श्री.शब्बीर अली, जि.प सदस्य श्री.रविंद्र पाटील, अर्बन बँक संचालिका श्रीमती.माधुरी गोसावी, माजी जि.प सदस्या सौ.पार्वती पाटील, रवी पाटील सामाजिक विकास मंडळ अध्यक्ष श्री.बाळाराम पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे अध्यक्ष श्री.शिरीष कडू, श्री.राजेश कडू, श्री.अशोक जयस्वाल, श्री.साईचरण पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अतिशय उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रविशेठ पाटील, अध्यक्ष श्री.शिरीष कडू व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन.

Read More
सेंट जोसेफ हायस्कुल नवीन पनवेल येथे ध्वजारोहन सोहळा.

भारताच्या ७० व्या गणराज्य दिनानिमित्त सेंट जोसेफ हायस्कुल,नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना ध्वजारोहन करण्याचा बहुमान देण्यात आला. गणराज्य दिनानिमित्त सेंट जोसेफ हायस्कुल,नवीन पनवेल येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हायस्कुल चे सन्माननीय प्राचार्य,सन्माननीय उपप्राचार्य,सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी,तसेच नागरिक व विध्यार्थी-विद्यार्थिनी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

Read More

Social Media Profile's

शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य बना

शेतकरी कामगार पक्ष पनवेल सदस्य होण्यासाठी खाली दिलेला बटन दाबा

Click Here!
Tesitmoinals

What poeple Say About us

Subcribe Our

Newsletter