Home | Pritam J Mhatre
  • +91 9326050505
  • Shop No 15, Ashoka Garden,Dhutpapeshwar Corner.

Press release


Image here
पनवेल शहरात रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलणार, पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्स्थेस भाडेतत्वावर देण्यास महासभेत मंजुरी
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्थेस भाडेतत्वावर देण्यास महासभेत मंजुरी देण्यात आलेली आहे. याबाबत पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी याबाबत सातत्याने पाठपुरावा ठेवणारे आमदार बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांचे तसेच प्रशासन तसेच सभागृहाचे देखील आभार मानले आहेत.

पनवेल महानगरपालिकेची स्थापना दिनांक १ ओक्टोबर २०१६ रोजी झाली. त्यामध्ये पूर्वाश्रमीचे नगरपरिषदचे क्षेत्र समाविष्ट केले आहे. पुर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषद हद्दीतील अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) हा मंजूर विकास योजनेत व मंजूर नगररचना योजनेत प्रायमरी स्कूल व प्ले ग्राऊंड साठी आरक्षित आहे. सदर भूखंडाचे क्षेत्र ७१८८ चौ.मी. नगररचना योजनेनुसार आहे. पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषदेची नगररचना योजना ही शासनाने दिनांक ३१ ऑगस्ट २००९ अन्वये मंजूर केली आहे. त्याचे अभिलेख (योजनेचे नकाशे व फॉर्म १) हे सन २०१६ रोजी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार अभिलेख म्हणजेच भूखंडाचे मालमत्ता पत्रक व नकाशे करणेस उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल यांना त्याच वेळी देण्यात आले आहेत. अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) या भूखंडाची मोजणी संबंधित विभागाकडून दिनांक १६ मार्च २०२१ रोजी झाली आहे. त्यानुसार त्याचे मालमत्ता पत्रक व भूखंडाचा नकाशा संबंधित विभागाकडून प्राप्त होणार आहे. तसेच सदर भूखंड हा महानगरपालिकेस महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ८८ अन्वये ताब्यात आलेला आहे. सदर भूखंडात महानगरपालिके मार्फत भूखंडाच्या काही भागात जलकुंभ उभारण्यात आलेला आहे. त्याचे क्षेत्र १२०० चौ.मी. आहे. भूखंड नकाशात दर्शविल्यानुसार स्वतंत्र ठेवण्यात यावा.

महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्था संस्थेस भाडेतत्वावर देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा ठेवणारे आमदार बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यानी विशेष प्रयत्न केले. अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) चे क्षेत्र ७१८८ चौ.मी. आहे त्यातील त्यावेळी मूळ भूखंडाचे ९०० चौ.मी. क्षेत्र ताब्यात होते. ते क्षेत्र रयत शिक्षण संस्थेस देणेबाबत पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ७३२ हा तत्कालीन नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०८ नोव्हेंबर २००४ अन्वये देण्यास मान्यता दिली आहे. व उर्वरित क्षेत्रही ताब्यात आल्यावर देण्यास मान्यता दिली आहे. तरी सदर भूखंडाचे ताब्यात असलेले ९०० चौ.मी. क्षेत्र हे नाममात्र भाडयाने देण्यास हरकत नाही.असे पालिकेने म्हटले आहे.

तत्कालीन नगरपरिषदेचे अध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली २००४ साली झालेल्या नगरपरिषदेच्या सभेत अं.भु.क्र.२७३ मधील ताब्यात असणारे ९०० चौ.मी जागा भाडेपट्यावर देऊन उर्वरित जागा ताब्यात आल्यावर देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. आजच्या सर्वसाधारण सभेत उर्वरित जागा देण्यासंदर्भातला विषय मंजूर करण्यात आला. सातत्याने पाठपुरावा ठेवणाऱ्या आमदार बाळाराम पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब यांचे आभार तसेच त्याबद्दल पालिका आयुक्त, प्रशासन तसेच सभागृहाचे देखील आभार.
- प्रितम जनार्दन म्हात्रे
विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका

Read More
Image here
रोटरी क्लब ऑफ उलवे नोड आयोजित "उलवे मॅरेथॉन २०२१" ला भेट
रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या वतीने आज एक धाव पर्यावरण संवर्धनासाठी या ब्रीदवाक्य अंतर्गत "उलवे मॅरेथॉन 2021" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट दिली व विजेतेपद पटकवणाऱ्या खेळाडूंना बक्षिस देऊन गौरविले. यावेळी माझ्यासह रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रविशेठ पाटील, मा.डॉ.गिरीश गुणे, एल अँड टी प्रोजेक्ट हेड मा.श्री. सुनील कोल्हे, डॉ.अनिल परमार, सिनेअभिनेते श्री.शब्बीर अली, जि.प सदस्य श्री.रविंद्र पाटील, अर्बन बँक संचालिका श्रीमती.माधुरी गोसावी, माजी जि.प सदस्या सौ.पार्वती पाटील, रवी पाटील सामाजिक विकास मंडळ अध्यक्ष श्री.बाळाराम पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे अध्यक्ष श्री.शिरीष कडू, श्री.राजेश कडू, श्री.अशोक जयस्वाल, श्री.साईचरण पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अतिशय उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रविशेठ पाटील, अध्यक्ष श्री.शिरीष कडू व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन.

Read More
Image here
सेंट जोसेफ हायस्कुल नवीन पनवेल येथे ध्वजारोहन सोहळा.
भारताच्या ७० व्या गणराज्य दिनानिमित्त सेंट जोसेफ हायस्कुल,नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना ध्वजारोहन करण्याचा बहुमान देण्यात आला. गणराज्य दिनानिमित्त सेंट जोसेफ हायस्कुल,नवीन पनवेल येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हायस्कुल चे सन्माननीय प्राचार्य,सन्माननीय उपप्राचार्य,सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी,तसेच नागरिक व विध्यार्थी-विद्यार्थिनी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

Read More
Image here
कै. प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृती चषक 2019
निहाल स्पोर्ट्स ओवळे आयोजित "कै. प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृती चषक 2019" प्रकाश झोतातील नाईट क्रिकेट सामन्यांस पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट दिली. या वेळी नवी मुंबई महापौर मा.श्री.सागर नाईक,मा.श्री.अमित मुंगाजी-सरपंच ओवळे,मा.श्री.राजेश शेठ म्हात्रे,कर्नाळा स्पोर्ट्स उपाध्यक्ष मा.श्री.रवीशेठ पाटील,पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष मा.श्री. रमाकांत म्हात्रे,मा.श्री.बाळाराम पाटील,सुप्रसिद्ध आगरी-कोळी गीत गायक मा.श्री.संतोष चौधरी (दादूस),मा.श्री.निलेश गायकवाड,मा.श्री.उदय दपोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Read More
Image here
झी २४ तास विकास महाराष्ट्राचा आवाज नवी मुंबईचा पुरस्कार २०२२
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संसंस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना झी २४ तास विकास महाराष्ट्राचा आवाज नवी मुंबईचा पुरस्कार २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read More
Image here
मा.श्री.डॉ. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पासपोर्ट फोटो वाटप
पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते मा.श्री.डॉ. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कार्यालयीन उपयोगासाठी लागणारे "मोफत पासपोर्ट फोटो " या उपक्रमाचे आयोजन गुडविल पॅराडाइस सेक्टर १५,खारघर येथे करण्यात आले होते. या वेळी पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस मा.श्री.गणेश कडू,पमपा नगरसेवक मा.श्री.गुरुनाथ गायकर,पनवेल विधानसभा मतदार संघ उपाध्यक्ष मा.श्री.अजित अडसूळे,मा.ग्रा.सदस्या मा.सौ.उषाताई अडसुळे,मा.जि.प. सदस्य श्री. राम करावकर,रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष मा.श्री. देवा पाटील,मा.श्री. संतोष गायकर,मा. श्री.संतोष तांबोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Read More
Image here
आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
महानायक,भारतरत्न ,आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोकण शिक्षक मतदार संघ आमदार मा.श्री. बाळाराम द. पाटील, मा.आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब , मा.तालुका चिटणीस मा.श्री. नारायनशेठ घरत, पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते मा.श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे, तालुका चिटणीस मा.श्री. एकनाथशेठ भोपी, नगरसेविका मा.सौ.डॉ. सुरेखा मोहोकर,मा.सौ. प्रीती जॉर्ज, पनवेल अर्बन बँक संचालिका मा.सौ.माधुरी गोसावी, मा. नगरसेवक वजुभाई सादरानी, बौद्धाचार्य धम्मरत्न मा.श्री. हिरामण जोशी गुरुजी यांनी विधिवत पूजा करत,प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महानायक,भारतरत्न ,आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींस अभिवादन केले.

Read More
Subcribe Our

Newsletter